Download App

श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं आव्हान

  • Written By: Last Updated:

मुंबई : दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती.

त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला.

टीम इंडियाकडून हुड्डाने नाबाद 41 आणि अक्षर पटेलने 31 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या 29 धावा करुन माघारी परतला. ईशान किशन 37 रन्स करुन आऊट झाला. शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन स्वस्तात बाद झाले.

श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताकडून शुबमन गिल आणि शिवम मावी या दोघांचं श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून पदार्पण झालं आहे. सूर्यकुमार यादवने शुबमनला तर कॅप्टन हार्दिकने मावीला कॅप देऊन स्वागत केलं.

Tags

follow us