Stuck in India despite being eliminated from the World Cup Darren Sammy expressed his sorrow in four words : सध्या मध्य पुर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जगभरातील विविध सेवा खंडीत झाल्या आहेत. त्यामध्ये विविध एअरस्पेस बंद करण्यात आल्याने बाहेरील देशात अडकलेले लोक मायदेशी परतण्यासाठी आतुर आणि चिंतेत आहेत. त्याच दरम्यान भारतात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतात आलेल्या वेस्ट इंडिजचा मुख्य कोच डॅरेन सॅमीने चार शब्दांत आपला संताप आणि दु:ख व्यक्त केलं आहे.
नेमकं काय म्हणाला डॅरेन सॅमी?
1 मार्च 2026 ला टी-20 वर्ल्डकपच्या ( T20 World Cup) सुपर आठच्या शेवटच्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव केला. त्यानंतर वेस्ट इंडिज टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. मात्र तरी देखील या देशाच्या खेळाडूंचा संघ मायदेशी परतू शकत नाही. कारण सध्या सध्या मध्य पुर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जगभरातील विविध सेवा खंडीत झाल्या आहेत. त्यामध्ये विविध एअरस्पेस बंद करण्यात आल्याने बाहेरील देशात अडकलेले लोक मायदेशी परतू शकत नाही.
I just wanna go home
— Daren Sammy (@darensammy88) March 5, 2026
यावर आता वेस्ट इंडिजचा मुख्य कोच डॅरेन सॅमीने चार शब्दांत आपला संताप आणि दु:ख व्यक्त केलं आहे. डॅरेनने याबाबत ट्विट करत लिहीलं आहे की, ‘मला फक्त घरी जायचं आहे.’ यामध्ये त्याची चिंता, काळजी आणि संताप पाहायला मिळाला.
रोहित पवारांच्या आरोपांना बळ? सुनेत्रा पवार कुटुंबियांसह घेणार पंतप्रधान मोदींची भेट
टी-20 वर्ल्डकपच्या ( T20 World Cup) सुपर आठच्या शेवटच्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करत सेमीफायनलचे तिकिट काढलंय. संजू सॅमसनने (Sanju Samson) विडिंजची गोलंदाजी फोडून काढत षटकार व चौकार मारत धावांची 97 तुफानी खेळी केली. संजूने 26 चेंडूत अर्धशतक झळकविले. त्याला तिलक वर्माने जबरदस्त साथ दिली. त्याने 15 चेंडूत 27 धावांची खेळी केली. आता सेमीफायनलमध्ये भारत पाच मार्चला इंग्लंडशी भिडणार आहे.
