Sunil Chhetri : भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार कमबॅक करत मालदीवविरुद्ध (Maldives) झालेल्या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. बुधवार, 19 मार्च 2025 रोजी शिलाँग (Shillong) येथे खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने मालदीवचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात भारतासाठी सुनील छेत्री, राहुल भेके आणि लिस्टन कोलाकोने गोल केले.
तर दुसरीकडे तब्बल 489 दिवसानंतर म्हणजेच नोव्हेंबर 2023 नंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळावला आहे. नोव्हेंबर 2023 पासून भारतीय संघाने 12 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते मात्र भारताला एकही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. भारताचा पुढचा सामना 5 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
Three headers get the job done for India in Shillong! 🇮🇳💙#INDMDV #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/ZiD5VuJWub
— Indian Football Team (@IndianFootball) March 19, 2025
मालदीवविरुद्धच्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारताने एक गोल केला होता. राहुल भेकेने 35 व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर 66 व्या मिनिटाला लिस्टन कोलाकोने गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर त्यानंतर 77 व्या मिनिटाला सुनील छेत्रीने हेडरद्वारे भारताचा तिसरा गोल केला. आतरराष्ट्रीय सामन्यात आता सुनील छेत्रीचे 95 गोल झाले आहे.
95TH GOAL FOR SUNIL CHHETRI 🔥🔥🔥
🇮🇳 INDIA 3-0 MALDIVES 🇲🇻
India is totally dominating the Gameplay 💪
pic.twitter.com/BYa69h1Cbl— The Khel India (@TheKhelIndia) March 19, 2025
चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची ‘डेट फिक्स’; 60 कोटींच्या चर्चेत पोटगीचा खरा आकडा समोर
2027 च्या एएफसी आशियाई कप पात्रता तिसऱ्या फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांनी सुनील छेत्रीला निवृत्ती मागे घेण्याची विंनती केली होती.