न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय…फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री..

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने 9 गडी राखत दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवलायं.

WhatsApp Image 2026 03 04 At 9.47.58 PM

WhatsApp Image 2026 03 04 At 9.47.58 PM

New Zeland : टी-20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने (New Zeland ) दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत रोमहर्षक विजय मिळवलायं. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 170 धावांचं आव्हान पेलत न्यूझीलंडने 9 गडी राखत रोमहर्षक विजय मिळवलायं. टी-20 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये रविवार दि. 8 मार्चला होणार आहे.

भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ 6 मार्चला होणार पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

कगिसो रबाडा याने न्यूझीलंडची सेट जोडी फोडली आहे. रबाडाने टीम सायफर्ट याला क्लिन बोल्ड केला. सायफर्टने 33 बॉलमध्ये 58 रन्स केले आहेत. न्यूझीलंड संघाचा फलंदाज फिन एलनने चांगलीच कामगिरी करीत 38 चेंडूत 100 धावा केल्या तर रचिन रविंद्र याने त्याची साथ देत 11 चेंडूत 13 धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत विजयी घोडदौड कायम होती. मात्र उपांत्य फेरीत नांगी टाकली. न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह न्यूझीलंडचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा पोहोचला आहे. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं.

Exit mobile version