टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना आज रविवारी 28 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. (Asia Cup) स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात महाअंतिम सामन्यात हे 2 शेजारी देश आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडिया या 17 व्या आशिया कपमध्ये अजिंक्य आहे. भारताने सलग 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणखी एक विजय मिळवून आशिया चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहे.
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारत प्रथम गोलंदाजी करणार असून संघात तीन बदल केले आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी रिंकु सिंगची निवड केली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचं कमबॅक झालं आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत आहोत. ही चांगली खेळपट्टी दिसते. प्रकाशात खेळपट्टी चांगली होते. आम्ही सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होतो पण आज आम्हाला पाठलाग करायला आवडेल. येथील मैदानातील खेळाडूंनी विकेटसह उत्तम कामगिरी केली आहे आणि ती तशीच राहील. गेल्या पाच सहा सामन्यांपासून आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत ते खूपच चांगले आहे आणि आम्हाला ते पुढे चालू ठेवायचे आहे. दुर्दैवाने हार्दिक दुखापतीमुळे खेळणार नाही. बुमराह, दुबे आणि रिंकू आले आहेत.
मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची वर्णी; वाचा, कोण आहेत मन्हास?
पाकिस्तानला तिसरा झटका
टीम इंडियाने शतकी सलामी भागीदारी करणाऱ्या पााकिस्तानला दणका देत सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने पाकिस्तानला 107 धावांवर पहिला झटका देत सेट जोडी फोडली. त्यानंतर टीम इंडियाने 2 ओव्हरमध्ये 2 झटके देत सामन्यात कमबॅक केलं आहे. टीम इंडियाने साहिबजादा फरहान, समॅ अयुब याच्यानंतर मोम्हमद हारीस याला आऊट केलं आहे. हारीसला भोपळाही फोडता आला नाही.