IND vs IRE : आयर्लंडकडून पहिल्यांदाच टीम इंडियाला व्हाईटवॉश…अय्यरची कॅप्टन्सी फेल!

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयर्लंडकडून पहिल्यांदाच भारताचा पराभव झालायं.

ind vs ire

ind vs ire

IND vs IRE 2nd T20 : टी-20 मालिकेत आयर्लंडकडून पहिल्यांदाच टीम इंडियाला व्हाईटवॉश मिळाला असून टीम इंडियाचा कॅप्टन श्रेयस अय्यर कॅप्टन्सी फेल ठरलीयं. टी20 मालिकेत मोठा उलटफेर दिसला असून दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडने भारताचा अवघ्या 1 धावेने पराभव करत मालिका 2-0 ने जिंकलीयं. आयर्लंडने इतिहास रचत पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला पराभूत केले आहे.

भारतासाठी ही टी-20 मालिका निराशाजनक ठरली असून नव्या टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 इतिहासात प्रथमच मालिका गमवावी लागलीयं. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का बसला आहे.

अवघ्या एका धावेने भारताचा पराभव
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला विजयासाठी चांगली संधी होती. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय फलंदाजांना आवश्यक धावा करता आल्या नाहीत आणि संघाला केवळ 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आयर्लंडने केवळ सामना जिंकला नाही, तर भारतीय संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयही नोंदवला.

आनंदाची बातमी ! रायगडावर आता अत्याधुनिक रोपवे; शिवभक्तांना 50 ते 100 रुपयांत गडावर जाण्याची सुविधा

आयर्लंडची कामगिरी चांगली…
ही मालिका आमच्यासाठी निश्चितच चांगली राहिली नाही. त्यासाठी आयर्लंडच्या संघाचे पूर्ण श्रेय द्यावे लागेल. कारण त्याने चांगले क्रिकेट खेळले. त्याचबरोबर त्यांचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते. त्यांनी सर्व विभागांत आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. पुढे तो म्हणाला की, आज आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी आपल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. मात्र फलंदाजीत आम्ही कमी पडलो. खेळपट्टीचा योग्य अंदाज घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. तसेच एकेरी धावा दुहेरीत रूपांतरित करण्यातही आम्ही मागे पडलो. आयर्लंडने याच बाबतीत आम्हाला मागे टाकले असल्याची प्रतिक्रिया कर्णधार अय्यरने दिलीयं.

Exit mobile version