मुंबई : यावर्षी टी20 चा विश्वचषक झालाच शिवाय आशिया कपही यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात खूप खेळाडूंनी कमाल कामगिरी केली. आयसीसीने टी20 ची टीम जाहीर केली आहे. ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर याला सोपवण्यात आलं आहे.
या टीम मध्ये भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा यालाही स्थान देण्यात आलं आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय खेळाडू सर्वाधिक आहेत. याशिवाय इंग्लंडचा सॅम करन, झिम्बाब्वेचा सिंकदर रझा पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान, हॅरीस रौफ या खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे.
संपूर्ण संघाचा विचार करता भारताचे तीन, पाकिस्तानचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचं ICC च्या सर्वोत्तम T20 टीममध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा आयसीसीनं 2022 च्या सर्वोत्कृष्ट T20 आंतरराष्ट्रीय टीममध्ये आयर्लंड आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे. याचं कारण या दोघांनी 2022 वर्षात टी20 फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. याच कारणामुळे दोन्ही खेळाडूंना आयपीएल लिलावातही विकत घेण्यात आले होते. हे दोन खेळाडू म्हणजे सिकंदर रझा आणि जोश लिटल असून रझा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, तर लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.संघ कसा आहे पाहूया…
अशी आहे आयसीसी टी20 टीम
जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सॅम करन, वानिंदू हसरंगा, हॅरीस रौफ,जोश लिटिल