Download App

अपयशाचे साईड इफेक्ट! न्यूझीलंडला दोन धक्के; ‘या’ स्टार खेळाडूने कप्तानी सोडली

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने कर्णधारपद सोडण्याबरोबरच 2024-25 साठीचे सेंट्रल काँट्रॅक्ट न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Kane Williamson Central Contract : केन विलियमसनच्या नेतृत्वातील यंदा (Kane Williamson) विश्वचषकाच्या साखळी फेरीतच गारद झाला. या स्पर्धेत संघाचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले. या अपयशानंतर न्युझीलंड क्रिकेटमध्ये (New Zeland) मोठ्या उलथापालथी होत आहेत. कर्णधार केन विलियमसनने संघाचे कर्णधारपद सोडण्या बरोबरच 2024-25 साठीचे सेंट्रल काँट्रॅक्ट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र असे काही होणार नाही. क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटसाठी उपलब्ध असेल असे विलियमसनने जाहीर केले आहे.

न्युझीलंड क्रिकेटने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आगामी काळात विलियमसन विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे. यादरम्यान तो न्युझीलंड संघासाठी उपलब्ध नसेल. या कारणामुळेच विलियमसनने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड क्रिकेटच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान, याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी विलयमसनने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

अफगाणिस्तानची हॅट्ट्रीक! PNG वर एकतर्फी विजय अन् न्यूझीलंड वर्ल्डकपमधून बाहेर

विलियमसनची क्रिकेट कारकिर्द

दरम्यान, विलियमसनने स्पष्ट केले आहे की न्युझीलंडसाठी तो नेहमीच उपलब्ध असेल. कुटुंबाला वेळ देण्यासाठी (ICC T20 World Cup 2024) आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. विलियमसनने आतापर्यंत 100 कसोटी, 165 एकदिवसीय सामने आणि 93 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 8 हजार 743 रन केले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात 6 हजार 810 आणि टी 20 मध्ये एकूण 2 हजार 575 रन केले आहेत. कसोटीत 32 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये विलियमसनने 13 शतके झळकावली आहेत.

न्यूझीलंड विश्वचषकातून बाहेर

अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव करत सुपर 8 फेरीत प्रवेश केला. मात्र त्यांच्या या विजयाचा न्यूझीलंडला मोठा फटका बसला. न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ क गटात होते. या गटातून सुपर 8 मध्ये पोहोचणारा वेस्टइंडिज हा पहिलाच संघ ठरला आहे. न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने गमावले होते. अफगाणिस्तानने तीनपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने राहिलेले दोन्ही सामने जिंकल्यानंतरही सुपर 8 फेरीचे दरवाजे उघडणार नाहीत.

T20 World Cup मध्ये आज IND vs PAK; पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यावर पावसाचं सावट

follow us

वेब स्टोरीज