T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 साठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. टी20 विश्वचषकासह आज न्युझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. बीसीसीआय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
फेब्रुवारी 7 पासून सुरु होणाऱ्या टी20 स्पर्धेत (T20 World Cup 2026) भारतीय संघ (Team India) आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
विश्वचषक आणि न्यूझीलंड मालिकेसाठी संघ सारखाच असणार?
निवड समिती न्यूझीलंडसाठी टी20 संघ देखील निवडेल आणि हा संघ विश्वचषकासाठी निवडलेल्या संघासारखाच असेल. सध्याच्या भारतीय टी20 संघात कोणत्याही जागेसाठी स्पर्धा नाही, परंतु जयस्वालसारखा आशादायक पर्याय असूनही, गिलच्या संघातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे संघात काही बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संजू सॅमसन संघात बॅकअप सलामीवीर
भारतीय संघात सध्या संजू सॅमसन बॅकअप सलामीवीर आहे. सॅमसनच्या प्रभावी कामगिरी असूनही, गिलच्या पुनरागमनानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला या भूमिकेतून काढून टाकले. जर टी20 विश्वचषक सहा महिन्यांवर असता, तर निवड समितीकडे कर्णधारपदासाठी पर्यायी नावांवर विचार करण्याची संधी असती.
पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली आहे.या मालिकेतील चौथा टी20 सामना रद्द झाला होता. पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताकडून सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची दमदार भागीदारी केली. संजूने 22 चेंडूत 37 धावा केल्या, तर अभिषेक शर्माने 21 चेंडूत 34 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी शानदार कामगिरी केली. तिलक वर्मा यांनी 42 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 73 धावा केल्या. हार्दिक पंड्याने भारतासाठी टी20 मध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक केले. त्याने 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने 25 चेंडूत 36 धावा केल्या.
आसाममध्ये रेल्वे अपघात; राजधानी एक्सप्रेस रुळावरून घसरली, 8 हत्तींचा मृत्यू
टी20 विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर
संभाव्य स्टँडबाय: यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, शाहबाज अहमद/नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा.
