Download App

Tamim Iqbal : भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या ‘तमीम’ च्या आठवणीत राहणाऱ्या इनिंग्स्…

  • Written By: Last Updated:

2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बांग्लादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्यांचा कर्णधार तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. (Tamim’s memorable innings that brought tears to the eyes of Indians…)

बांग्लादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 16 वर्षे बांग्लादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान तमिमच्या बॅटमधून अनेक महत्त्वपूर्ण खेळी निघाल्या आहेत. त्याचा एका खेळीमुळे भारताला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. चला तर मग त्याच्या कारकिर्दीतील पाच संस्मरणीय खेळींवर एक नजर टाकूया.

206 वि पाकिस्तान, 2015

2015 मध्ये तमिम इक्बालने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले. तमिमने 278 चेंडूत 206 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने हा पराक्रम केला. एवढेच नाही तर कसोटी क्रिकेटमधील बांग्लादेशी खेळाडूची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

103 वि ओमान, 2016

तमीम इक्बालने 2016 च्या टी-20 विश्वचषकात आपल्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. तमिमने धर्मशाला येथे ओमानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत 103 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. या शतकात त्याचा स्ट्राइक रेट 163.49 होता.

104 वि इंग्लंड, 2016

तमिम इक्बालने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ढाका कसोटीत अप्रतिम शतक झळकावले होते. रँक टर्नर खेळपट्टीवर त्याने पहिल्या डावात 104 धावांची जबरदस्त खेळी खेळली. त्याच्या या खेळीमुळेबांग्लादेशने इंग्लंडचा 108 धावांनी पराभव केला.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

लॉर्ड्स 106 विरुद्ध इंग्लंड, 2010

मे 2010 मध्ये तमिम इक्बालने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत त्याने हा पराक्रम केला. तमिमने अवघ्या 94 चेंडूत शतक झळकावले होते. 100 चेंडूत 103 धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी इंग्लंडने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.

51 वि भारत, 2007 विश्वचषक

2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात तमिम इक्बालने भारताविरुद्ध 53 चेंडूत 51 धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. बांग्लादेशने 192 धावांचं लक्ष्य 5 विकेट्स राखून पार केलं. विश्वचषकात बांगलादेशचा भारतावर पहिला विजय ठरला. बांग्लादेशच्या या विजयाने भारताला विश्वचषकातूनही बाहेर पडावे लागले होते.

 

Tags

follow us