नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडून न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सीरीजसाठी भारतीय टीमचा संघ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी देखील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजच्या चार सामने असतील. यामध्ये टेस्ट सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी कार अपघातादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंत उपलब्ध नसल्यामुळे स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात इशान किशन आणि केएस भरत यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहचा संघात समावेश नाही, तर सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट यांची संघात निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस-कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (व्हिकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा , मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.