ICC Rankings : तिन्ही प्रकारात टीम इंडियाचा डंका !

ICC Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनला आहे. याआधी, ‘मेन इन ब्लू’ने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. भारतीय क्रिकेट इतिहासात राष्ट्रीय संघाने एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (12)

ICC Rankings

ICC Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनला आहे. याआधी, ‘मेन इन ब्लू’ने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. भारतीय क्रिकेट इतिहासात राष्ट्रीय संघाने एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटी नुकतीच संपली, त्यानंतर आयसीसी कसोटी संघ क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात करत अव्वल स्थान पटकावले. कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे रेटिंग ११५ आहे. आणि ऑस्ट्रेलियाचे 111 रेटिंग गुण आहेत. कसोटी संघाच्या क्रमवारीत इंग्लंडचा संघ १०६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड (100 रेटिंग) आणि दक्षिण आफ्रिका (85) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर स्थिर राहिले.

 

आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेटचे वर्चस्व 

नंबर 1 कसोटी संघ – भारत
क्रमांक 1 टी 20 संघ – भारत
नंबर 1 एकदिवसीय संघ – भारत
क्रमांक 1 टी- 20 फलंदाज – सूर्या
नंबर 1 वनडे गोलंदाज – सिराज
नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू – जडेजा

टीम इंडियाचा ऐतिहासिक ‘महाविक्रम’

भारतीय क्रिकेट संघाने हा इतिहास रचला आहेच. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 संघ बनला आहे. टीम इंडिया सध्या कसोटी, एकदिवसीय आणि T20 प्रकारात जगातील नंबर 1 संघ बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडचे एकत्रित रेटिंग १११ असून हे संघ तिसरे आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा संघ १०६ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

अश्विनही कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर

आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडीच्या जाळ्यात कांगारु अडकले होते. रविंद्र जाडेजाने पहिल्या डावात तर अश्विन याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. या फिरकी जोडीनं दोन्ही डावात 15 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आता आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमावारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 846 गुणांसह अश्विन चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमात फक्त 21 गुणांचा फरक आहे.

आंतरराष्ट्रीय T20 मध्येही अव्वल

टी-20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीतही भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचे 267 रेटिंग गुण आहेत. येथे भारतीय संघ टी-20 विश्वचषक चॅम्पियन इंग्लंडपेक्षा फक्त एक रेटिंग पॉइंट पुढे आहे. इंग्लंडचे 266 रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा संघ २५८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका (256) आणि न्यूझीलंड (252) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Exit mobile version