WTC Final : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 2-0 ने (SAvsSL) पराभव केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनल सामन्यासाठी भारतीय संघासाठी (Team India) समीकरण बदलले आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दुसऱ्या कसोटी सामन्यात सोमवारी श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव केल्याने आफ्रिका आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये पहिले स्थानावर पोहोचला आहे. याच बरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे.
डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतासह दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) स्पर्धा दिसून येत आहे. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी किती आशा उरल्या आहेत ते समजून घेऊया.
डब्लूटीसी भारतासाठी समीकरण
भारताने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाचा 4-1 किंवा 3-1 ने पराभव केला किंवा ही मालिका 3-2 ने जिंकल्यास आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दोनपैकी एका सामन्यात पराभूत केल्यास भारत डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तर दुसरीकडे जर भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-3 ने गमावली आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने पराभूत केला आणि ऑस्ट्रेलियाने दोनपैकी एका कसोटीत श्रीलंकेचा पराभव केला तरीही देखील भारतीय संघ डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने सोमवारी श्रीलंकेला विजयासाठी 348 धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेला विजयासाठी 143 धावांची गरज होती आणि पाच विकेट शिलक्क होते. कर्णधार धनंजय डी सिल्वा (50) आणि कुसल मेंडिस (46) यांची सहाव्या विकेटसाठीची 97 धावांची भागीदारी तुटल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा दुसरा डाव 238 धावांवर आटोपला.
खा. लंके यांच्याकडून हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन
आफ्रिकेकडून केशव महाराजने 76 धावांत पाच बळी घेतले.पहिल्या डावात 358 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 328 धावांत गुंडाळले होते. दुसऱ्या डावात आफ्रिकेने 317 धावा केल्या.