बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, टीम इंडियालाही मोठं सरप्राइज
BGT 2024-25 Australia 1st Test Squad : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात येत्या २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) आपल्या १३ सदस्यीय स्क्वॉडची घोषणा केली आहे. फक्त पहिल्या सामन्यासाठीच ही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियासाठी (Team India) मोठं सरप्राईज दडलं आहे.
या स्पर्धेआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या संघात दोन कसोटी सामने खेळवण्यात आले होते. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत टीम इंडियाचा सुपडा साफ केला. या मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज नॅथन मॅकस्वीनी याला पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली आहे. टीम इंडियासाठी हेच मोठं सरप्राइज राहणार आहे.
Australia vs Scotland: जोश इंग्लिसचे टी-20 त वेगवान शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस !
मॅकस्वीनीने भारत अ संघाविरुद्ध खेळताना दोन्ही कसोटी सामन्यांत चार डावांत एकूण १६६ धावा केल्या होत्या. आता बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला सलामीचा फलंदाज अजून तरी मिळालेला नाही.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडलाही संधी मिळाली आहे. बोलँड तिन्ही प्रकारांत खेळू शकणारा गोलंदाज आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील या संघात बहुतांश प्रमुख खेळाडूंना संधी मिळाली आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा,मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क
मोठा उलटफेर! अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; कमिन्सची हॅट्ट्रीकही निष्फळ