Australia vs Scotland: जोश इंग्लिसचे टी-20 त वेगवान शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस !

  • Written By: Published:
Australia vs Scotland: जोश इंग्लिसचे टी-20 त वेगवान शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस !

Josh Inglis t20 century: स्कॉटलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत (t20) (Australia vs Scotland)ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिस (Josh Inglis) ने जबरदस्त कामगिरी करत वेगवान शतक झळकविले. त्याने अवघ्या 43 चेंडूत शतक झळकविले आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्याने सर्वात वेगवान शतक झळकविले आहे. त्याने 49 चेंडूत 103 धावा केल्या. त्यात सात चौकार आणि सात षटकारांचा पाऊस पाडला आहे.

मराठा समाजासाठी तुम्ही ऐक थेंबही रक्त सांडल नाही; आमदार राजेंद्र राऊतांचे जरांगेंवर टीकास्त्र

नाणेफेक जिंकत स्कॉटलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात ट्रेविस हेडको याला वेगवान गोलंदाज ब्रॅड करीने बोल्ड केले. पहिल्याच चेंडूवर तो खातेही उघडू शकला नाही. तर दुसरा सलामीवीर जॅक फ्रेजर मॅकर्गक हा बारा चेंडूत बारा धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेटकीपर जोश इंग्लिस आणि कॅमरून ग्रीन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची मोठी भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाने 14 षटकांत तीन बाद 144 धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतर स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. 19 व्या षटकात इंग्लिस हा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला डाव 196 धावांत आटोपला. स्कॉटलंडसाठी करीने तीन गडी बाद केले. तर क्रिस सोलने तीन षटकांत अवघ्या सतरा धावा दिल्या.


महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लिसने ऑस्ट्रेलियालासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकविण्याचा विक्रम केला आहे. त्याने आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियासाठी टी-20 त वेगवान शतके

43 चेंडूत- जोश इंग्लिस विरुद्ध स्कॉटलंड, एडिनबर्ग 2024

47 चेंडूत-आरोन फिंच विरुद्ध इंग्लंड , साउथॅम्प्टन, 2013

47 चेंडूत -जोश इंग्लिस विरुद्ध भारत, विशाखापट्टणम, 2023

47 चेंडूत – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध भारत, गुवाहाटी, 2023

49 चेंडूत-ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, 2016

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक टी-20 शतके

ग्लेन मॅक्सवेल-5

आरोन फिंच-5

जोश इंग्लिस-2

डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन-1

follow us
  • fb
  • instagram
  • youtube