Aus Vs Sco : ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम, हेडची तुफानी इनिंग, स्कॉटलंडला ठोकले 6 षटकात 113 धावा

  • Written By: Published:
Aus Vs Sco : ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम, हेडची तुफानी इनिंग, स्कॉटलंडला ठोकले 6 षटकात 113 धावा

Aus Vs Sco : स्कॉटलंडविरुद्धच्या (Scotland) पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) एक नवीन विश्वविक्रम केला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 6 षटकात 113 धावा करत टी-20 इंटरनॅशनलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता. टी-20 विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिज (West Indies) संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) सामन्यात पॉवरप्लेमध्ये 92 धावा केल्या होत्या.

या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे फक्त ऑस्ट्रेलियाने केवळ 9.4 षटकांत पूर्ण केले. 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवतील मोठा धक्का बसला. पदार्पणाचा सामना खेळत असलेला फ्रेझरला खाते देखील उघडता आले नाही. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) पॉवरप्लेमध्ये 22 चेंडूत 73 धावा केल्या, या दरम्यान त्याने 12 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

5 दिवसांत रामगिरी महाराजांवर कारवाई करा, अन्यथा…, इम्तियाज जलील यांचा CM शिंदेंना अल्टिमेटम

तर दुसरीकडे कर्णधार मिचेल मार्शने (Mitchell Marsh) 11 चेंडूत 39 धावांची खेळी केली. हेड आणि मार्शमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी झाली.मिचेल मार्श 12 चेंडूत 39 धावा केले तर ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावा केले. त्यानंतर जोश इंग्लिशने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आणि मार्कस स्टायनिसने 8 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 62 चेंडू शिल्लक असताना जिंकला, जो चेंडूंच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 सचिन खिलारीने रचला इतिहास गोळाफेकमध्ये 1984 नंतर भारताला पदक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube