पॅरिस पॅरालिम्पिक 2024 सचिन खिलारीने रचला इतिहास गोळाफेकमध्ये 1984 नंतर भारताला पदक
Sachin Khilari : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 (Paris Paralympics 2024) मध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिकच्या 7 व्या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने (Sachin Khilari) पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक (Silver Medal) जिंकून इतिहास रचला आहे.
भारताला या इव्हेंटमध्ये तब्बल 40 वर्षानंतर पदक मिळाला आहे. पॅरालिम्पिकच्या या इव्हेंटमध्ये भारताला शेवटचा पदक 1984 मध्ये मिळाला होता. या इव्हेंटमध्ये सचिनने शानदार कामगिरी करत 16.32 मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. तर कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने (Greg Stewart) सुवर्णपदक जिंकले. तर दुसरीकडे भारताने आतापर्यंत पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये 21 पदक जिंकले आहे.
आशियाई विक्रम मोडून पदक जिंकले सचिनने या सामन्यात आपल्या दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी करत 16.30 मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडत रौप्य पदक जिंकले आहे. यापूर्वी सचिनने जपानमध्ये मे 2024 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर चीनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही देखील सचिनने सुवर्णपदक जिंकले होते. F46 श्रेणी मध्ये अशा खेळाडूंना संधी मिळते ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे. यामध्ये खेळाडू उभे राहून स्पर्धा करतात.
विद्यार्थ्यांना दिलासा, वैद्यकीय शिक्षणासाठी मिळणार सवलत, सरकारचा मोठा निर्णय
सांगली जिल्ह्यातील कारागणी गावात सचिनचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. शाळेत असताना एका अपघातात त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले होते. यानंतर सचिनने 2017 मध्ये जयपूर येथे राष्ट्रीय खेळांमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज