Paris Paralympics 2024 मध्ये भारताची कमाल, मनीषाने रचला इतिहास, 11 पदकांवर मोहर

  • Written By: Published:
Paris Paralympics 2024 मध्ये भारताची कमाल, मनीषाने रचला इतिहास, 11 पदकांवर मोहर

Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये (Paris Paralympics 2024) भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आतपर्यंत 11 पदके जिंकली आहे. सोमवारी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू तुलसिमती मुरुगेसन (Tulsimati Murugesan) आणि मनीषा रामदास (Manisha Ramdas) यांनी महिला एकेरीच्या SU5 स्पर्धेत पदके जिंकली.

भारतासाठी तुलसीमतीने रौप्य आणि मनीषाने कांस्यपदक जिंकली आहे. या स्पर्धेत 19 वर्षीय मनीषाने इतिहास रचला आहे. ती पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या कॅथरीन रोसेन्ग्रेनचा 21-12 21-8 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले आहे. तर दुसरीकडे फायनल सामन्यात तुलसीमतीला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात चीनच्या यांग किउ झियाविरुद्ध 17-21 10-21 असा पराभव झाला.

उपांत्य फेरीत तुलसीमतीने मनीषाचा पराभव केला होता. मात्र फायनल सामन्यात तिला छाप पाडण्यात अपयश आले. SU5 श्रेणी ही अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांना वरच्या अंगाचे विकार आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितीश कुमार यांनी भारताला SL3 प्रकारातील सध्याच्या खेळांमधील पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक मिळवून दिले.

पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तुलसीमती आणि मनीषा यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ‘X’ वर लिहिले की, “मनीषा रामदासने पॅरालिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्यासाठी चमकदार कामगिरी केली.

त्याच्या समर्पण आणि चिकाटीमुळे ही अतुलनीय कामगिरी झाली . मनीषाचे अभिनंदन.” यानंतर पंतप्रधानांनी लिहिले, ”तुलसीमतीने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल. त्याचे खेळाप्रती असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे. त्याचे अभिनंदन.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube