प्रीती पालची चमकदार कामगिरी; १०० मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई

प्रीती पालची चमकदार कामगिरी; १०० मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आताही प्रीती पालने भारतासाठी शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्समधील पदकांचे खाते उघडले. महिलांच्या 100 मीटर शर्यत (टी35) 14.21 सेकंद अशा विक्रमी वेळेत कांस्यपदकाची कमाई केली. वैयक्तिक प्रकारात तिने ही सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत चीनचे खेळाडू आघाडीवर राहिले. चीनच्या झोऊ शिया हिने 13.58 सेकंदात अंतर पार करत गोल्ड मेडल पटकावले. चीनच्याच गुओ कियानकियान हिने 13.74 सेकंदात अंतर पार करत सिल्व्हर मेडलची कमाई केली.

नीरज चोप्राची भन्नाट कामगिरी! बेस्ट थ्रो करत मोडलं पॅरिस ऑलिम्पिक्समधलं रेकॉर्ड

प्रीती पाल मुळची उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरची रहिवासी आहे. जन्मतः तिच्या पायाचा भाग कमकुवत आहे. सध्या ती उपचार घेत आहे. या अवस्थेत तिने जिद्द दाखवत स्पर्धेत भाग घेत अभिमानास्पद कामगिरी केली. विशेष म्हणजे तिची ही पहिलीच स्पर्धा आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने मोठं यश संपादन केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube