5 दिवसांत रामगिरी महाराजांवर कारवाई करा, अन्यथा…, इम्तियाज जलील यांचा CM शिंदेंना अल्टिमेटम
Imtiyaj jaleel: रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात सरकारने कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजामधून होत आहे. यातच एमआयएमचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj jaleel) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जर पुढील पाच दिवसात रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईकडे (Mumbai) कूच करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, आम्ही सरकारला पाच दिवसांचा वेळ देतो, रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अन्यथा भारतीय ध्वज गाड्यावर लावून मी आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार आणि सोबत संविधानाची एक पुस्तक तुम्हाला आणि प्रत्येक आयपीएस (IPS) आणि आयएएस (IAS) ऑफिसरला भेट म्हणून देणार मग सांगू नका एवढ्या मोठ्या संख्येने का निघालात. असा इशारा राज्य सरकारला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच मुस्लिम समाजाने गाड्यांची सोय करून ठेवा, लवकरच तारीख सांगु असेही यावेळी ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी जलील म्हणाले की, मुख्यंमत्री टपोरी नेत्यांसारख बोलले रामगिरी महाराज यांचा केसाला धक्का लावू देणार नाही. संपूर्ण देशात रामगिरी महाराज विरोधात 58 गुन्हे दाखल झाले आहे. लोकांचा रोष वाढत आहे आणि त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात येत आहे असेही यावेळी जलील म्हणाले.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 सचिन खिलारीने रचला इतिहास गोळाफेकमध्ये 1984 नंतर भारताला पदक
गुन्हे दाखल होऊन देखील पोलीस कारवाई करत नाही. आता नितेश राणे सारखे चिल्ले पिल्ले देखील बोलत आहे. वर्दीतील पोलीस म्हणजे आरएसएस आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहे असेही यावेळी जलील म्हणाले.