बटले डॅनी…दम है तो कुर्ला में आ…; भाजप नेत्याचा नितेश राणेंना घरचा आहेर
Haji Arafat Shaikh On Nitesh Rane : बटले डॅनी…इतनी बात मत कर अगर दम है तो कुर्ला में आ हाजी अराफत शेख खडा है, या शब्दांत भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना घरचा आहेर दिलायं. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित सकल हिंदू समाजाच्या मोर्चात नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. राणे यांच्या या विधानानंतर अहमदनगरमधील मुस्लिम समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. आता भाजपचेच नेते हाजी अराफत शेख यांनीही नितेश राणेंच्या विधानावर आक्रमक भूमिका घेत त्यांना ओपन चॅलेंजच दिलंय.
मोठी बातमी! पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट? दिल्ली पोलिसांचा अहवाल कोर्टात
हाजी अराफत शेख म्हणाले, नितेश राणे यांच्या विधानानंतर मुस्लिम समाजातील नेते मला विचारत होते की भाजपचा एक आमदार मशिदीत घूसुन मारण्याची भाषा करीत आहे. नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये जात मशिदीकडे पाहून उंगली केलीयं. मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय, राणेंमध्ये मर्दाची आत्मा येते माहित होतं पण आता स्त्रियांचीही आत्मा येत असल्याचं दिसून येत आहे. बटले डॅनी…इतनी बात मत कर अगर दम है तो तो कुर्ला में आ… में खडा हूं, या शब्दांत शेख यांनी राणेंना ओपन चॅलेंज दिलंय.
शिरसाट यांच्याविरोधात ठाकरेंची खेळी; भाजपचा जुना शिलेदार जड जाणार?
महंत रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नगरमध्ये मुस्लिम समाजाकडून महाराजांविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावत मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाजही आक्रमक झाल्याचं दिसून आला होता.
जंगलाला आग लागली अन् गेंडा पळाला, मुश्रीफांच्या गडात जानकरांची तुफान फटकेबाजी
काय म्हणाले होते आमदार राणे?
रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे, असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं होतं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर नितेश राणे यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप नेत्याने ओपन चॅलेंज दिल्यानंतर नितेश राणे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, या गोष्टीची दखल प्रदेशाध्यक्ष घेतील, प्रदेशाध्यक्षांना हा विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यावर मला काही बोलायची गरज नाही, असं नितेश राणे म्हणाले आहेत.