विरोधक ‘चायनीज मॉडेल’ शिवप्रेमी; ‘जोडो मारो मोर्चा’ला नितेश राणेंकडून नवीन नाव

विरोधक ‘चायनीज मॉडेल’ शिवप्रेमी; ‘जोडो मारो मोर्चा’ला नितेश राणेंकडून नवीन नाव

Nitesh Rane : विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विरोधकांना नवीन नाव दिलंय. दरम्यान, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळ्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुंबईत जोडो मारो आंदोलन केलयं. या आंदोलनावरुन नितेश राणेंनी विरोधकांनी नवीन नाव दिलंय. अहमदनगरमध्ये ते बोलत होते.

सख्खा भाऊ अन् वहिनीनेच काढला काटा; पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक खु्नाचं गुढ उकललं..

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटेंनी केलेली चूक आम्हाला सर्वांना मान्य आहे, आम्ही सर्व शिवप्रेमी आहोत. जेव्हा पुण्यातल्या हडपसरमध्ये पठाणने शिवरायांचा पुतळा दगडाने तोडली तेव्हा विरोधकांनी जोडो मारो आंदोलन केलं नाही, हे दुतोंडी राज्यकर्ते आहेत. खरा शिवप्रेमी जात-पात बघत नाही, पुण्यात घटना घडली तेव्हा जोडो मारो आंदोलन का केलं नाही, आज आंदोलन करणारे हे चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत, जयदीप आपटेच्या विरोधात एक अन् पठाणविरोधात एक भूमिका विरोधक घेत आहेत, ते हिंदूद्वेषी असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीयं.

‘स्पंद अंतरीचे’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

तसचे शिल्पकार आपटे हा कोणत्याही बिळात लपलेला असला तरी तो जगात जगाच्या पाठीवर ते आपल्याला कोणीही वाचवणार नाही श्रीकांत शिंदे असो किंवा कोणीही त्याला पाठीशी घालणार नाही कारण आम्हाला शिवराय हेच महत्त्वाचे आहे शिवराय हे आमच्या अग्रस्थानी असून त्यावरून आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही या आपट्याला आम्ही बिळातून बाहेर काढून आपटणार अशा भाषेत राणे यांनी आपला संताप व्यक्त केलायं.

तर चून-चून के मारेंगे..
छत्रपती शिवरायांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी कोणी वर येणार नाही, आमचे अब्बा तुमच्या अब्बांच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्तानात बोलले आहेत. त्यामुळे एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखं मारु, ज्या रॅलीत नितेश राणे चालतो, तिकडं कोणी येत नाही, हा हिंदुंचा देश येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही, कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, या शब्दांत नितेश राणे यांनी धमकावलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube