“मस्ती कराल, तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू”; नितेश राणेंची पोलिसांना धमकी

“मस्ती कराल, तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू”; नितेश राणेंची पोलिसांना धमकी

Nitesh Rane : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्याची जोरदार चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. सरकार हिंदूचं आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मस्ती केली तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं.

Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य

सांगली जिल्ह्यातील पलूस येथे शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चासाठी पोलीस बंदोबस्तही होती. यावेळी मोर्चातील उपस्थितांना संबोधित करताना आमदार नितेश राणेंनी आक्रमक शैलीत भाषण केले. यावेळी राणेंनी व्यासपीठावरूनच पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं.

सरकार हिंदूंचं आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहे. तुम्ही आता ज्या पदावर आहात त्यात तुम्हाला मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात पाठूव की तिथून बायकोला फोन सुद्धा लागणार नाही. मी कधी निवेदन देत नाही. डायरेक्ट कार्यक्रम करत असतो अशा शब्दांत नितेश राणे यांनी पोलिसांनाच दम भरला. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या विरोधात पलूस शहरात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर येथे सभाही झाली. या सभेत भाजप नेत्यांनी आक्रमक भाषणे केली.

‘उद्धव ठाकरे दिल्लीला मुजरा करायला गेले होते’; नितेश राणेंचा खोचक टीकेचा बाण

लव्ह जिहादच्या संदर्भात तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात नोंदवून घेतली पाहिजे. असं जर केलं नाही तर पुढील तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन आम्ही धिंगाणा घालू असा इशारा नितेश राणे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यांची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नितेश राणे यांनी याआधीही अशीच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता त्यात आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube