Download App

Video : वानखेडे तयार! टीम इंडियासाठी मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांची गर्दी, पहा व्हिडिओ

Team India Victory Parade :  T20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ मायदेशी (Team India) परतला

Team India Victory Parade :  T20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ मायदेशी (Team India) परतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेऊन आता भारतीय संघ मुंबईत दाखल झालं आहे.

नुकतंच भारतीय संघाचा मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आगमन झालं आहे. मुंबई विमानतळावर देखील चाहत्यांकडून भारतीय संघाचा जोरदार स्वागत करण्यात आला आहे. आता काही वेळेत भारतीय संघ बसमध्ये बसून मरीन ड्राईव्हसाठी निघणार आहेत.

मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) देखील लाखोंच्या संख्येने भारतीय संघाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून चाहत्यांना मरीन ड्राईव्हवर येऊ नका असा आवाहन करण्यात येत आहे मात्र तरीही देखील चाहते मरीन ड्राईव्हवर येत आहे.

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आज (4 जुलै) सकाळी भारतीय दिल्लीत पोहोचला. दिल्लीत देखील भारतीय संघाचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आला.

Video : टीम इंडिया मुंबईत दाखल, मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा महासागर, पहा व्हिडिओ

follow us

वेब स्टोरीज