Download App

एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का

एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होत आहे.तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर जसेकी रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

यंदाचं वर्ष हे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणताही धोका पत्करुन इच्छित नाही. त्यामुळेच बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्याचा वेळ दिला जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
10 जानेवरी- पहिला एकदिवसीय सामना, गुवाहाटी, दुपारी 1.30 वा.
12 जानेवरी- दूसरा एकदिवसीय सामना, कोलकाता, दुपारी 1.30 वा.
15 जानेवरी- तीसरा एकदिवसीय सामना, तिरुवनंतपुरम, दुपारी 1.30 वा.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

टीम श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

Tags

follow us