Download App

IND Vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

  • Written By: Last Updated:

रायपूर : रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवत मालिकेतही 2 -0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघालामाघारी परतवलं

तत्पूर्वी टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धक्के दिले. शमीनं पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. शमीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

न्यूझीलंडच्या काही खास करता आले नाही त्यांच्याकडून सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरला. ज्यामुळे त्यांची धावसंख्या 108 पर्यंत पोहोचली.

109 धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातच दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर शुभमन गिलसोबत पुन्हा एकदा अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर शर्मानं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करून 51 धावांवर बाद झाला. कोहलीही काही खास करू शकला नाही तो केवळ 11 धावा करुन पुन्हा सँटनरचा शिकार झाला. पण शुभमन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने नाबाद 40 तर ईशान किशनने नाबाद 8 धावा करत भारताचा विजय मिळून दिला. न्यूझीलंडकडून शिंपले आणि सँटनरने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवल्या.

Tags

follow us