Download App

भारताला मोठा धक्का, कसोटी पाठोपाठ ‘हा’ खेळाडू एकदिवसीय सामन्यातून झाला बाहेर

मुंबई : नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवडकर्त्यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र सामन्यांपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेत भारतीय संघाचा एक मोठा चेहरा अनुपस्थित असणार आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू दुखापतीमुळे तब्बल तीन ते चार महिने मैदानापासून दूर राहणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज बुमराह बर्‍याच काळापासून दुखापतग्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये बुमराह हा संघात नव्हता. उपचारासाठी बुमराह हा न्यूझीलंडला गेला आहे. तसेच दुखापतीतून ठीक होण्यासाठी बुमराहला तीन ते चार महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत, बुमराह आयपीएल 2023 च्या बाहेर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जसप्रीत बुमराहची क्रिकेट कारकीर्द
बुमराहने आतापर्यंत भारतीय संघासाठी 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय आणि 60 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 128 विकेट्स तर एकदिवसीय सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने टी -20 मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

नगरच्या खराब रस्त्यांचा अजितदादांच्या ताफ्याला फटका; खड्डे चुकवत गाठली पाथर्डी

भारताचा एक यशस्वी गोलंदाज म्हणून बुमराहकडे पहिले जाते. जुलै 2022 मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यानंतर बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो सतत संघातून बाहेर राहिला आहे. यातच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील तो दिसला नाही.

Mangaldas Bandal : अजित पवारांना चॅलेंज दिलं… अन् सभापती होऊन दाखवलं!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी असा असणार आहे भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, कुल्दीप यादवद, वॉशिंग्टन मोहम्मद सिराज, उमरन मलिक, शार्डुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकत.

Tags

follow us