Download App

भारत विरुद्व न्यूझीलंड यांच्यात आज अंतिम सामना रंगणार

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज मंगळवारी (२४ जानेवारी) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 2017 नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. जर भारतीय संघ तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल.

आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने जर प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंडला पराभूत केले तर न्यूझीलंडचा मालिकेतून पराभव होईल. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये 12 धावांनी तर दुसरा सामना रायपूरमध्ये 8 विकेटने जिंकला होता.

भारताची नजर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपकडे असेल. गेल्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात भारताने शेवटचे सर्व सामने जिंकले होते. त्यानंतर पाच सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकली. त्या मालिकेत गौतम गंभीर टीम इंडियाचा कर्णधार होता.

खेळपट्टी आणि हवामान
होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर खूप धावा झाल्या आहेत. सपाट खेळपट्टी, वेगवान आऊटफिल्ड आणि शॉर्ट बाऊंड्रीज पाहता हा सामना पुन्हा एकदा उच्च स्कोअरिंग होईल अशी अपेक्षा आहे. दवचा प्रभाव दुसऱ्या डावात दिसून येईल.

भारतीय संघ (संभाव्य) – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, मायल्क ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर, लॉकी फर्ग्युसन.

Tags

follow us