IND vs AUS: आज रंगणार पहिला एकदिवसीय सामना

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कास्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. कसोटी मालिका काबीज केल्यांनतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर असतील. कोणता […]

Untitled Design (88)

Untitled Design (88)

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कास्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. कसोटी मालिका काबीज केल्यांनतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर असतील.

कोणता संघ आहे वरचढ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 143 वनडे मॅच खेळल्या गेल्या आहेत. या सामन्यांपैकी 80 मॅच या ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत तर भारताने केवळ 53 मॅच जिकल्या आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध घरच्या मैदानावर देखील आपले वर्चस्व दाखवले आहे. भारताने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर 64 वनडे सामने खेळले आहेत. पाहुण्या संघाने भारतात 30 एकदिवसीय सामने जिंकले आहेत तर टीम इंडियाला 29 सामने जिंकण्यात यश आले आहे.

ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे आज मुंबईत हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. येथे ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाची शक्यता नाही. दिवसा तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे, जे संध्याकाळी 26 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते. यामुळे पहिला सामना प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघ: शुभमन गिल, इशान किशन (विकेट किपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव , उमरान मलिक, जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी (विकेट किपर), कॅमेरॉन ग्रीन, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस , नॅथन एलिस

Exit mobile version