पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आता पुरुषांप्रमाणेच महिलांच्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यंदा प्रथमच या स्पर्धेत महिला मल्लांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेसाठी तयारी सुरू करण्यात आली असून कुस्ती संघटनेशी संबंधित दोन गटांकडून दोन वेगवेगळ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुस्ती स्पर्धांच्या आयोजनावरुन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कुस्ती संघटनेशी संबंधित दोन गटांकडून दोन वेगवेगळ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही स्पर्धांची घोषणा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे कोणती संघटना आणि कोणती स्पर्धा अधिकृत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाचा : महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा शिवराज राक्षे आहे तरी कोण?
पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा घेण्याची घोषणा केली. तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडूनही सांगलीत 23 आणि 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमच होणारी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
आमची संघटना अधिकृत आहे. कोणताही संभ्रम नाही. या मार्फतच 23 व 24 मार्च रोजी सांगली येथे महिलांच्या कुस्ती स्पर्धा होत आहेत. नंतर 25 व 26 रोजी कोल्हापूर येथे कुमारांच्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. तसेच 27 व 28 मार्च रोजी पुण्यातील मामासाहेब मोहोळ संकुल येथे ग्रीक रोमन राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत.
Wrestlers Protest : कुस्ती संघाच्या कामकाजासाठी समिती गठीत, ‘ही’ महिला खेळाडू आहे अध्यक्ष
आमचे जिल्हा संघ संलग्न आहेत. त्यांच्यात कोणताही संभ्रम नाही. दोन महिन्यांआधीच चाचणी घेण्याची पत्रके दिली होती. फक्त तारख निश्चित नव्हत्या. त्याही आता निश्चित झाल्या आहेत. आमचे सगळे व्यवस्थित चालले आहे. राज्य संघटना ही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेलाही संलग्न आहे. संघटनेच्यावतीने गुजरातला ज्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या त्यातही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचेच संघ खेळले, अशी माहिती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली.