मुंबई – केवळ 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येअर्शदीपने 15 नो बॉल टाकले आहेत. त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात नो बॉल टाकून तो या बाबतीत नंबर-1 झाला आहे.
रांची येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या डावात अर्शदीपने शेवटच्या षटकात नो बॉलने सुरुवात केली. या चेंडूवर डॅरिल मिशेलने षटकार लगावला. पुढच्या फ्री हिटवरही त्याने पुन्हा षटकार मारला. यानंतर षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅरिल मिशेलने त्याला षटकार ठोकला. अशाप्रकारे त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एकूण 19 धावा खर्च केल्या. त्याने संपूर्ण षटकात एकूण 27 धावा दिल्या. इतक्या धावा लुटल्यामुळे त्याचे नाव दोन लाजिरवाण्या विक्रमांच्या यादीतही नोंदवले गेले आहे.
T20I मध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारे गोलंदाज
1. अर्शदीप सिंह: 15
2. हसन अली: 11
3. कीमो पॉल: 11
4. ओशाने थॉमस: 11
5. रिचर्ड एनगरावा: 10
T20I मध्ये 20व्या षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज
1. अर्शदीप सिंह: 27 रन (2023)
2. सुरेश रैना: 26 रन (2012)
3. दीपक चहर: 24 (2022)
4. खलील अहमद: 23 (2018)
T20I मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज
1. शिवम दुबे: 34 रन (2020)
2. स्टुअर्ट बिन्नी: 32 रन (2016)
3. शार्दुल ठाकुर: 27 रन (2018)
4 अर्शदीप सिंह: 27 रन (2023)