Download App

IND vs AUS: हे तीन खेळाडू WTC फायनल खेळू शकणार नाहीत, रोहित शर्माचे टेन्शन वाढले

  • Written By: Last Updated:

मुंबई : टीम इंडियाने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. यासह टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पोहचली आहे.टीम इंडिया डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सलग दुसऱ्यांदा खेळणार आहे. मात्र यावेळी अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचे हे तीन खेळाडू खेळू शकणार नाहीत.

1. जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकणार नाही. बुमराह दीर्घकाळापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज आहे. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे तो अनेक महिन्यांपासून त्रस्त आहे. यापूर्वी बुमराह आशिया कप 2022, टी-20 विश्वचषक 2022 आणि बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळू शकला नव्हता. त्याच वेळी, हा खेळाडू डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला आहे. बुमराहची जागा शोधणे ही व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी आहे.

2. ऋषभ पंत

गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू असलेल्या ऋषभ पंतचा या वर्षाच्या सुरुवातीलाच कार अपघात झाला होता. या अपघातात पंत इतका जखमी झाला की तो बराच काळ क्रिकेट खेळू शकणार नाही. पंत डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळू शकणार नाही. हा सामना ओव्हलवर खेळवला जाईल. या मैदानावर पंतने यापूर्वी एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. अशा स्थितीत त्याची संघातील अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंतची कामगिरी कशी आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे.

Onkar Bhojane : ‘त्याने थोडं आधी…; गोस्वामींनी व्यक्त केली खंत 

3. श्रेयस अय्यर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला पाठीला दुखापत झाली होती. यानंतर तो भारताच्या पहिल्या डावात फलंदाजीलाही येऊ शकला नाही आणि त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. हा खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या आयपीएल खेळण्यावरही सस्पेन्स आहे. अय्यरला पाठीला दुखापत झाली आहे. पाठीच्या दुखापती काही वेळा सहजासहजी बऱ्या होत नाहीत आणि अशा परिस्थितीत अय्यरला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.

Tags

follow us