मुंबई : यावर्षीपासून महिलांच्या टी-20 क्रिकेट लीगला ( Womens Premier League ) सुरुवात होते आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) संघाने आपल्या महिला संघाच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. भारतीय संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत कौर (Haramanpreet Kaur ) आता मुंबई इंडियन्सच्या संघाची कर्णधार असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन नीता अंबानी यांनी हरमनप्रीत कौरच्या नावाची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधीत्व हरमनकडे सोपवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हरमनप्रीत ही भारताच्या राष्ट्रीय संघाची कर्णधार आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक अनेक विजय मिळवले आहेत, अशा शब्दात नीता अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
हरमनप्रीत ही भारतीय संघाची कर्णधार आहे. तिने आत्तापर्यंत 150 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचे सामने खेळले आहेत. 150 टी-20 सामने खेळणारी हरमन ही पहिलीच खेळाडू आहे. तिने भारतीय संघासाठी अनेकवेळा उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच तिच्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हरमनला अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये तिच्यावर 171 धावांच्या वैयक्तीक खेळीचा रेकॉर्ड आहे.
दरम्यान भारतीय संघाची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी ही मुंबई इंडिय़न्सच्या संघाची मेन्टॉर असणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 4 मार्च रोजी डी बाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सच्या विरोधात होणार आहे.
Maharashtra Assembly : भास्कर जाधवांनी राऊतांसाठी एकाकी खिंड लढवली…
मुंबई इंडियन्स संघाची टीम : हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.