चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (बुधवार) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत.
पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. आता या मालिकेतील तिसरा सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक एक वाजता होईल आणि थेट मॅच दीड वाजता सुरू होईल. पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. त्याच वेळी, डिस्ने + हॉटस्टारवर सामन्याचे थेट प्रसारण केले जाईल.
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11 काय असू शकतात
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.