नवी दिल्ली : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia ) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. यावेळीही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले असून, रेनशॉच्या जागी ट्रॅव्हिस हेड, तर मॅथ्यू कुहनमन पदार्पण करणार आहे. रोहित शर्मानेही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे.
नागपूर कसोटीत कांगारूंना पराभूत केल्यानंतर, रोहित शर्माची नजर कांगारूंना पराभूत करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याकडे असेल. टीम इंडियाचा दिल्ली कसोटीतील विजय अनेक अर्थांनी खास असेल. जर भारतीय संघ दुसरी कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला तर आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवेल.
या विजयासह भारत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ जाईल. WTC गुणतालिकेत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत पुनरागमनाकडे लक्ष देईल.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनमन
Kasba Bypoll Election : धंगेकर मनसे कार्यालयात जाताच फडणवीस झाले सतर्क, पायगुडेंना लगेच फोन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज