‘महाराष्ट्राचा वाघ’ ठरला विश्वविजेता; विजय चौधरीने जागतिक स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

Vijay Chaudhary : महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू पोलीस अधीक्षक विजय नत्थु चौधरी हे नवे चॅम्पियन  ठरले आहेत. ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम’ स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी फायनलमध्ये धडक मारली अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर […]

WhatsApp Image 2023 07 30 At 3.18.23 PM

WhatsApp Image 2023 07 30 At 3.18.23 PM

Vijay Chaudhary : महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू पोलीस अधीक्षक विजय नत्थु चौधरी हे नवे चॅम्पियन  ठरले आहेत. ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम’ स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी फायनलमध्ये धडक मारली अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर दहा गुणांची मोठी आघाडी घेत सामना 11-01 ने जिंकत चॅम्पियन ठरले. (triple maharashtra kesari vijay choudhary became world champion india won gold medal in world police and fire games 2023)

कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी भारताचे नाव उंचावले आहे. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते.

विजय चौधरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल लॉट पडला होता. उपांत्य फेरीत गतविजेत्या जेसी साहोटाशी यांचा सामना होता. अटीतटीच्या लढतीत चौधरी यांनी 11-08 अशा 3 गुणांनी मात केली. अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर दहा गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 किलो गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थनंतर या स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू भाग घेत असतात. आता या महत्त्वाच्या स्पर्धेत विजय चौधरी यांनी देशाचं नाव उंचावलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये वानवडी येथे अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा झाली होती. त्यामध्ये हरियाना, पंजाब व जम्मू-काश्मीरच्या कुस्तीपटूंना अस्मान दाखवत विजय चौधरी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वेळी चौधरी यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.

 

Exit mobile version