Download App

IND vs AUS : इंदूरची खेळपट्टी बनली भारतीय फलंदाजांसाठी कोडे, चाहत्यांनी Twitter वर उडवली खिल्ली

इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (IND vs AUS) तिसरा कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, (IND vs AUS 3rd Test) इंदूर येथे खेळवला जात आहे. मात्र, पहिल्याच दिवशी यजमानांची अवस्था पाहता हा कसोटी सामनाही पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तीन दिवसांत संपेल, (IND vs AUS LIVE Score) इंदूरच्या खेळपट्टीवर अक्षरशः चाहत्यांनी खिल्ली उडवण्यास सुरवात केली.

पहिल्या दिवशी, मॅथ्यू कुहनमन, नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी या ऑस्ट्रेलियाच्या फिरकी त्रिकुटाने शानदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजी रुळावर आणली. या सामन्यात भारताची पहिल्या डावात दुसऱ्या सत्रात 33.2 षटकात 109 अशी अवस्था झाली होती. कुहनमनने कारकिर्दीत पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या. तर लिओनने 3 आणि मर्फीने 2 विकेट घेतल्या.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक २२ (५२) धावा केल्या. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताची आणि खेळपट्टीची अशी अवस्था पाहून चाहते फारसे खूश नाहीत, ते ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. इंदूरच्या खेळपट्टीवर अक्षरशः चाहत्यांनी खिल्ली उडवण्यास सुरवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार भारताने या सामन्यात दोन बदल केले आहेत. त्याने केएल राहुलच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. खराब फॉर्ममुळे राहुलला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शमीला विश्रांती देण्यात आली आहे.

Tags

follow us