Download App

World Cup 2023 : सेमीफायनलसाठी दोन नवीन नियम; सामना रद्द झालाी तरी निकाल लागणार

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

या दोन्ही सामन्यातील विजयी संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे. दरम्यान, चाहते फायनलची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, सेमीफायनलच्या दोन नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

सेमीफायनलमध्ये डबल मजा, राखीव दिवस ठेवण्यात आला
ICC ने विश्वचषक सेमीफायनल आणि अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. जर सेमीफायनल सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आणि सामना पूर्णपणे रद्द झाला, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण होईल. अशा परिस्थितीत, राखीव दिवशी पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांचे स्थान गुणतालिकेत दिसेल आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ विजयी होईल.

Rohit Sharma : रो’हिट’ कामगिरी! षटकार खेचला अन् गांगुलीचा रेकॉर्ड मोडला

अशा स्थितीत भारतीय संघाला याचा फायदा होईल, कारण भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकन संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास त्याचा फायदा आफ्रिकन संघाला होईल.

सेमीफायनल बरोबरीत सुटला तर काय होईल?
सेमीफायनल आणि फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरमध्ये विजेत्याचा निर्णय घेतला जाईल. सुपर ओव्हरही टाय राहिल्यास आणखी एक सुपर ओव्हर होईल. अशा परिस्थितीत विजेता संघ सुपर ओव्हरमधूनच निवडला जाईल.

अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दिवाळीत बहिण-भावांचं बाँडिंगही दिसले !

राखीव दिवशी सामना झाला नाही तर काय परिणाम होईल?
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाऊस पडल्यास, सामना राखीव दिवसात खेळवला जाईल. त्याच वेळी, राखीव दिवशी पाऊस पडल्यास, पॉइंट टेबलच्या आधारावर सामन्याचा निर्णय घेतला जाणार नाही, परंतु अंतिम ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये सामायिक केली जाईल.

Tags

follow us