T20 World Cup 2026: नेट रनरेटमध्ये झेप; युएसएचा नेदर्लंड्सवर 93 धावांनी ऐतिहासिक विजय

यूएसएने तब्बल 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, असोसिएट संघाने धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

Untitled Design 35

Untitled Design 35

USA secure historic 93-run win over Netherlands : टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये ग्रुप ए मधील रोमांचक सामन्यात यूएसएने नेदरलँड्सवर ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला. शुक्रवार, 13 जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात यूएसएने तब्बल 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात असोसिएट संघाने धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत यूएसएने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 196 धावा उभारल्या. संघाला आक्रमक सुरुवात मिळाली. कर्णधार मोनांक पटेलने 22 चेंडूंमध्ये 36 धावांची झटपट खेळी केली, तर शयान जहांगीरने 14 चेंडूत 20 धावा जोडल्या. मात्र डावाची खरी ताकद ठरला सैतेजा मुक्कमल्ला. त्याने 51 चेंडूंमध्ये 79 धावांची दमदार खेळी करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. शुभम रंजननेही 24 चेंडूंमध्ये 48 धावांची तुफानी खेळी करत शेवटच्या षटकांत धावगती वाढवली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने 4 षटकांत 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सची सुरुवातच ढासळली. यूएसएच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत संपूर्ण संघाला अवघ्या 16 षटकांत 103 धावांवर गुंडाळले. नेदरलँड्सकडून बास डी लीडेनेच सर्वाधिक 23 धावा (17 चेंडू) केल्या. मायकेल लेविट 7 चेंडूत 3 धावा, मॅक्स ओ’डॉड 11 चेंडूत 13 धावा, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स 14 चेंडूत 20 धावा आणि रोएलॉफ व्हॅन डेर मेर्वे 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाले. मात्र कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही.

ढाकातील मतदारांनी हिंदू खासदार निवडला; गयेश्वर चंद्र रॉय कोण आहे ?

या विजयामुळे ग्रुप ए मधील गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकत 4-4 गुण मिळवले आहेत. नेट रन रेटमध्ये आघाडी घेत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूएसएने नेदरलँड्सवरच्या मोठ्या विजयामुळे आपला नेट रन रेट सुधारत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नेदरलँड्स आणि नामिबिया अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

यूएसएचा हा विजय केवळ दोन गुणांसाठी महत्त्वाचा नसून, असोसिएट संघांची ताकद अधोरेखित करणारा ठरला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील पुढील सामने आता अधिकच चुरशीचे होणार आहेत.

Exit mobile version