Vaibhav Suryavanshi : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हंगाम अनेक तरुण खेळाडूंसाठी संस्मरणीय होता आणि त्यापैकी सर्वात आक्रमक युवा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी ठरला. राजस्थान रॉयल्सच्या या तरुण फलंदाजानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं केवळ प्रसिद्धी मिळवली नाही तर ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्कारही जिंकला. (IPL) म्हणजेच, तो या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेटनं धावा करणारा फलंदाज होता. पण या दमदार कामगिरीसाठी मिळालेल्या बक्षीसाचा वापर करणं वैभवला महागात पडू शकतं.
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानं हंगामातील 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 206.55 होता. कमीत कमी 7 सामने खेळलेल्या आणि 100 पेक्षा जास्त चेंडू खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये हा स्ट्राइक रेट सर्वाधिक होता. यात वैभवनं 122 चेंडूत 24 षटकार आणि 18 चौकार मारले, ज्यामुळं त्याची आक्रमक फलंदाजी सिद्ध झाली.
विराटच्या विजयी आरसीबी बंगळुरूमध्ये दाखल पण ओपन बस परेड रद्द! कारणही आलं समोर
संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेटनं धावा करणाऱ्या फलंदाजाला दरवर्षी सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार दिला जातो. या कामगिरीबद्दल वैभवला ट्रॉफी आणि टाटा कर्व्ह कार देण्यात आली. हा सन्मान त्याच्यासाठी एक मोठी कामगिरी आहे, विशेषतः जेव्हा तो फक्त 14 वर्षांचा आहे आणि हा त्याचा पहिला आयपीएल हंगाम होता. पण वैभव सध्या त्याच्या वयामुळं बक्षीस म्हणून मिळालेली गाडी वापरु शकत नाही.
वैभवला हंगामातील सुपर स्ट्रायकर म्हणून टाटा कर्व्ह कार देण्यात आली. पण तो फक्त 14 वर्षांचा असल्यानं, तो स्वतः ही गाडी चालवू शकत नाही. भारतात, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्ससाठी किमान वय 18 वर्षे आहे. वयाच्या 16 व्या वर्षी 50 सीसी पर्यंतच्या स्कूटरसाठी परवाना मिळू शकतो, परंतु कार चालवण्यासाठी 18 वर्षे वय असणं अनिवार्य आहे. जर वैभव किंवा कोणताही अल्पवयीन मुलगा परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळला तर त्याला दंड होऊ शकतो आणि वाहन मालक किंवा पालकांनाही शिक्षा होऊ शकते.
The Curvv Super Striker of the Season award goes to Vaibhav Suryavanshi. #TATAIPL | #RCBvPBKS | #CurvvSuperStriker | #Final | #TheLastMile | @TataMotors_Cars pic.twitter.com/JQaXJSj4pH
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025