सचिनचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास; वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण

वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

News Photo   2026 07 04T194322.147

सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच (India) सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या सामन्यातील प्लेइंग 11 असेल अनेकांना वाटलं होतं. पण सामन्याच्या काही मिनिटाआधी उपकर्णधार तिलक वर्माने वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कॅप घातली आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार हे ठरलं. वैभव सूर्यवंशीला तिलक वर्मा यांच्या हस्ते त्याची पहिली भारतीय कॅप मिळाली.

वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिनने वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवसांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तर सूर्यवंशीने वयाच्या 15 वर्षे आणि 99 दिवसात पदार्पण केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही पुन्हा प्रथम फलंदाजी करू. संघात एक बदल आहे. संजूच्या जागी वैभवला संधी मिळाली आहे .

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सुपर 16चा थरार : कोणता संघ उधळणार विजयाचा गुलाल?

गेल्या काही महिन्यांत तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते तुम्ही पाहिलंच आहे. नाही, खरं तर नाही. मला वाटतं की तो संघात असण्यास पूर्णपणे पात्र आहे. तो असा खेळाडू आहे जो अजिबात दडपण घेत नाही. त्याचा स्वभाव अविचल आहे. येत्या सामन्यांमध्ये काय होणार आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे. तो ज्याप्रकारे नेटमध्ये फलंदाजी करतो आणि गोलंदाजांवर हल्ला चढवतो, त्यावरून तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे हे दिसून येतं. तुम्ही स्पर्धा पाहा, ती प्रत्येक सामन्यागणिक असते.

भारत ज्या प्रकारचे प्रतिभावान खेळाडू तयार करतो ते पाहून आनंद होतो. त्यामुळे आम्ही सतर्क राहतो. दडपण येणे ही एक संधी आहे, असे मला वाटते.  सूर्यवंशीने वयाच्या 13 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलच्या दोन हंगामांतील आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएल 2026 मध्ये 72 षटकारांसह 776 धावा करून सर्वाधिक धावा केल्या. याच कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन) : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टंग.

Exit mobile version