Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध; कारण काय?

Reserve Bank of India : देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेत राज्यातील एका सहकारी बँकेवर कारवाई करत सहा

Reserve Bank Of India

Reserve Bank of India : देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेत राज्यातील एका सहकारी बँकेवर कारवाई करत सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि सतत खालावणारी आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने मुंबईस्थित मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक वर सहा महिन्यांसाठी अनेक निर्बंध लादले आहेत. तर दुसरीकडे आरबीआयच्या या निर्णयानंतर खातेदारांना पैसे काढण्यावर विशिष्ट मर्यादा घालण्यात आली आहे.

खातेदारांवर परिणाम

आरबीआयने केलेल्या या कारवाईचा परिणाम बँकेच्या ठेवीदारांवर देखील होणार आहे. खातेदार आता त्यांत्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढू शकतात. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर पूर्णपणे आरबीआयकडून बंदी घालण्यात आली आहे. तर ज्या ग्राहकांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांना त्यांचे हप्ते भरण्याची मुभा आरबीआयने दिली आहे.

 नवीन कर्ज आणि गुंतवणुकीवर बंदी

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या या निर्बंधांच्या कालावधीत मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर विविध अटी लागू असतील. बँकेचे व्यवस्थापन आता नवीन ग्राहकांना कर्ज किंवा ऍडव्हान्स रक्कम देऊ शकत नाही, तसेच विद्यमान कर्जांचे नूतनीकरणही करू शकत नाही. तसेच बँकेला नवीन क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास, नवीन दायित्वे (liabilities) निर्माण करण्यास किंवा बाजारातून निधी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत बँक नवीन मुदत ठेवी (FDs) किंवा इतर ठेवी स्वीकारू शकत नाही.

परवाना रद्द नाही – आरबीआय

आरबीआयने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, या निर्बंधांकडे बँकिंग परवाना रद्द करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहू नये. बँकेची आर्थिक स्थिती आणि तरलता (liquidity) सुधारण्यासाठी ते बँकेचे मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहेत.

धर्मशालामध्ये भारताचे वर्चस्व; पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा

ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आणि बँकेच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांच्या अधीन राहून आपले बँकिंग कामकाज सुरू ठेवेल असं या निवेदनात आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

follow us