Download App

WTC Final: अक्षर पटेलचा बुलेटच्या वेगाने थ्रो, डोळ्याची पापणी लवताच मिचेल स्टार्क बाद, पहा व्हिडिओ

  • Written By: Last Updated:

Akshar Patel runs out Mitchell Starc : गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनलच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 327/3 धावसंख्येसह त्यांचा डाव वाढवला आणि पहिल्या सत्रानंतर त्यांनी सर्वबाद 469 धावा काढल्या. भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र चांगले राहिले, जिथे त्यांनी 150 धावात सात विकेट्स घेतल्या. यादरम्यान सर्वाधिक चर्चा आहे ती मिचेल स्टार्क (Mitchell Starc) च्या धावबादची, ज्याला अक्षर पटेलने ( Axar Patel) अचूक थ्रो मारून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. (axar-patel-direct-hit-sends-mitchell-starc-in-the-pavilion-in-wtc-final-ind-vs-aus-axar-patel-run-out-mitchell-starc)

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 104 व्या षटकाची आहे. मोहम्मद सिराजच्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टार्कने हलक्या हातांनी मिड-ऑफच्या दिशेने शॉट खेळून झटपट धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेथे, चपळ अक्षर पटेलने धावत येऊन चेंडू पकडला आणि नंतर डाव्या हाताच्या दिशेने डायव्हिंग करण्यापूर्वी एक थ्रो केला. थ्रो सेट केल्यानंतर पटेल घसरला, पण चेंडू थेट स्टंपवर गेला.

पटेल मिचेल स्टार्कला धावबाद करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने 20 चेंडूत 5 धावा केल्या. स्टार्क धावबाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 बाद 402 अशी होती. कर्णधार पॅट कमिन्स आणि अॅलेक्स कॅरीने आठव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. आणि धावसंख्या 450 पार केली.

Tags

follow us