Vinesh Phogat 1st Picture: पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशला वजन वाढल्यामुळं अपात्र ठरवण्यात आलं. या निर्णयामुळे तमाम भारतीयांचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगल. दरम्यान, अपात्र ठरल्यानंतर विनेशची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होत. आता रुग्णालयातील तिचा पहिला फोटो समोर आला.
महायुतीची डोकेदुखी वाढणार, विधानसभेसाठी मविआ तयार, मुंबईत घेणार मेळावा
हॉस्पिटलमधून समोर आलेला विनेश फोगटच्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. या फोटोत तिचा चेहरा हसरा दिसत असला तरी तिच्या हास्यामागे दडलेलं दुःख व यातना स्पष्ट दिसत आहेत. या फोटोत विनेशचे केस कापल्याचं दिसत आहेत. तिचे डोळे सुजलेले असून हाताला सलाईन लावलेलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी तिची भेट घेतली. त्या विनेशला धीर देत असल्याचं दिसत आहे. यावेळी पी. टी. उषा यांनी विनेशशी सविस्तर चर्चा केली.
President of the Indian Olympic Association (IOA) PT Usha met Indian wrestler Vinesh Phogat, in Paris, France
She was disqualified today from the Women’s Wrestling 50kg for being overweight.
(Pic source: IOA) pic.twitter.com/eKRCilr2lG
— ANI (@ANI) August 7, 2024
ऑलिम्पिक फायनलपूर्वी स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेश मानसिकरित्या कोलमडली होती. यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात केले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
विनेशला रौप्य पदक द्या – जॉर्डन बरोज
जॉर्डन बरोजने एक्सवर एक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने (UWW) आपल्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज अधोरेखित केली. त्याने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाला काही सूचना दिल्या. त्याने म्हटलं की, 1) दुसऱ्या दिवशी 1 किलो वजन वाढले तर सुट मिळावी. 2) वजन मोजमाप सकाळी 8.30 ते 10.30 दरम्यान घेतले जावे अशा अनेक सूचना केल्या. याशिवाय, जॉर्डनने अजून एक ट्वीट करत विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी केली
ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय, असं वाटत असतांनाच विनेश फोगटला ऑल्मिक स्वर्धेतून अपात्र ठरवलं. या मोठ्या निर्णयामागील कारण म्हणजे 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढलं होतं. विनेश फोगटचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा अंदाजे 150 ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे ती अपात्र ठरली. पण विनेशने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी तिला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले.