Download App

LSG vs RCB : भर मैदानात विराट-गंभीरची बाचाबाची, सामन्याचं सर्व मानधन दंड भरावं लागणार, बीसीसीआयची कारवाई

LSG vs RCB : सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ आमनेसामने आले होते. इकाना स्टेडिअमवर हा सामना सुरू होता. यावेळी आरसीबीने लखनौचा कमी धावसंख्येच्या सामन्यात पराभव केला. मात्र यावेळी 17 षटक सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कॅप्टन आणि लखनौचा नवीन उल हक यांच्यात वाद झाला.

या वादात मध्यस्थी करत असताना सामना संपल्यानंतर विराट आणि लखनौचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. मैदानावरच लाखो प्रेक्षकांसमोर हा वाद झाल्याचं पहायाला मिळाला. त्यामुळे या वादाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यावरून समर्थक प्रेक्षक देखील मजा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या वादाच नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाही. मात्र अनेर जण याचा संबंध बेंगलोरमधील मैदानावर झालेल्या प्रकारासोबत जोडत आहेत. तर काही विराट कोहलीने हिशोब चुकता केलाय. असेही नेटकरी म्हणत आहेत.

>LSG vs RCB फिरकीच्या जाळ्यात अडकली आरसीबी, लखनऊसमोर केवळ 127 धावांचे आव्हान

त्यामुळे आता यावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने विराट कोहली आणि गौतम गंभीरला दंड ठोठावला आहे. तसेच लखनौचा नवीन उल हक याच्यावर देखील कारवाई देखील करण्यात आली आहे. यामध्ये बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरला सामन्याचं संपूर्ण म्हणजे 100 टक्के मानधन दंड म्हणून भरावं लागणार आहे. तर आयपीएल सामन्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लखनौचा नवीन उल हक ठोठावला 50 टक्के दंड.

Tags

follow us