Virat Kohli 500th International Match: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील आणखी एक खास टप्पा गाठणार आहे. कोहली मैदानावर खेळेल तेव्हा त्याच्या कारकिर्दीतील हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. ही कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरणार आहे. या खास प्रसंगी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोहलीचे कौतुक केले आणि सांगितले की, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे, ज्यामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने कोहलीचे कौतुक करताना सांगितले की, हा त्याचा 500 वा सामना आहे हे मला माहीत नव्हते, मी संख्येच्या बाबतीत चांगला नाही. हे ऐकून खूप छान वाटलं आणि तो सर्व खेळाडूंसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. मग ते संघातील खेळाडू असोत किंवा ज्यांना देशामध्ये या खेळात आपले भविष्य घडवायचे आहे असे नवीन खेळाडू असो.
पाकिस्तान जिंकला पण, श्रीलंकेने घाम फोडला; एक वर्षानंतर रडतखडत मिळवला विजय
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, विराट कोहलीचे नंबर आणि रेकॉर्ड त्याच्याबद्दल सर्व काही सांगतात. पडद्यामागे कोहली सतत जी मेहनत घेतो ते फक्त मीच समजू शकतो. याच कारणामुळे आज तो 500 वा सामना गाठू शकला आहे. तुम्हाला हे सहजासहजी मिळत नाही. यासाठी तुम्हाला सतत मेहनत करावी लागते. त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहणे खूप छान होते. जेव्हा मी खेळायचो आणि तो संघात आला तेव्हा तो तरुण खेळाडू होता. गेल्या 18 महिन्यांत मला त्याला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याची संधी मिळाली. हे खूप छान होतं. कोहलीकडूनही मी खूप काही शिकलो.
‘The: Trial’ फेम अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘मी अन् काजोलने किसिंग सीन…’
500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम करणारा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील 10 वा खेळाडू ठरणार आहे. याशिवाय आतापर्यंत खेळलेल्या 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराटने 53.48 च्या सरासरीने एकूण 25461 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची 75 शतकेही आहेत. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, रिकी पाँटिंग, महेंद्रसिंग धोनी, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड या खेळाडूंनी आतापर्यंत 500 सामने खेळले आहेत.