पाकिस्तान जिंकला पण, श्रीलंकेने घाम फोडला; एक वर्षानंतर रडतखडत मिळवला विजय

पाकिस्तान जिंकला पण, श्रीलंकेने घाम फोडला; एक वर्षानंतर रडतखडत मिळवला विजय

SL vs PAK : पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते ते अखेर घडले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रडतखडत का होईना पण श्रीलंकेवर विजय मिळवला. तब्बल एक वर्षानंतर कसोटी सामना जिंकण्यात पाकिस्तानी संघाला यश मिळाले आहे. मात्र, या विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संघाच्या नेतृत्वारच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या सामन्यात पाकिस्तानला फक्त 131 रन करायचे होते. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तानी खेळाडूंना हैराण केले. दुसऱ्या डावात इमाम उल हकने 50 रन बनवत कसातरी विजय मिळवून दिला.

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत अश्विन-जडेजाचा दबदबा, यशस्वी जैस्वालची मोठी झेप

संघाचा कॅप्टन बाबर आझम पहिल्या डावात फेल झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्येही त्याला फार काही करता आले नाही. सरफराज अहमद, शान मसूद, साउद शकील हे खेळाडूही अपयशी ठरले. या विजयानंतर पाकिस्तानने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात रन बनविताना पाकिस्तानी फलंदाजांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. फिरकी गोलंदाज प्रभात जयसू्र्याने तुफान गोलंदाजी केली. जयसूर्याने चार विकेट घेत पाकिस्तानी संघाला हैराण केले.

पाकिस्तानी संघाने मागील 20 जुलै 2022 रोजी 146 कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर आणखी एक सामना जिंकण्यास एक वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर आज एक वर्षानंतर पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत 147 वा कसोटी विजय मिळवला. या विजयात पाकिस्तानचे कौतुक होण्याऐवजी श्रीलंकेच्या संघर्षाचीच जास्त चर्चा होत आहे. जयसूर्याने केलेली घातक गोलंदाजी चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे पाकिस्तानने मिळवलेला हा विजय श्रीलंकेच्या लढवय्येपणामुळे झाकोळला गेला आहे.

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत अश्विन-जडेजाचा दबदबा, यशस्वी जैस्वालची मोठी झेप

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube