Download App

Virat Kohli 500 Match : कोहली मोडणार सचिनचा विक्रम? जाणून घ्या ‘विराट’ मिशन

Virat Kohli Record : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहलीसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण हा सामना खेळून विराट आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. या सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवताच कोहली टीम इंडियासाठी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरणार आहे.(virat-kohli-500-matches sachin tendulkar IND vs WI )

विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर

18 ऑगस्ट 2008 रोजी पदार्पण करणारा विराट देशासाठी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल असं कधी वाटलं नसेल. मात्र विराट टीम इंडियासाठी फक्त खेळलाच नाही तर विराटने जागतिक स्तरावरही आपली छाप सोडली आहे. 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या विराटने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरलाही मागे टाकणार आहे.

Maharashtra assembly session : पहिल्याच दिवशी बच्चू कडूंची हवा: मंत्रिपदाचा शब्द अन् CM शिंदेंसोबत रॉयल एन्ट्री

अशी कामगिरी करणारा विराट भारताचा चौथा क्रिकेटपटू असणार आहे. त्याच्या आधी सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांनी यांनी असा पराक्रम केला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो 10 वा खेळाडू असणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

विराट आत्तापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 25461 धावा केल्या आहेत. त्यात 75 शतकं तर नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर आजपर्यंत सचिनन जागतिक क्रिकेटमध्ये 664 सामने खेळला आहे. त्यात सचिनने 100 शतकं केली आहेत.

विराटला त्याच्या 500 व्या सामन्यात शतक करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण सचिन तेंडुलकरने त्याच्या 500 सामन्यानंतर 75 शतकं झळकावली होती. त्यामुळे आता विराटने जर 500 व्या सामन्यातच शतक ठोकलं तर विराट सचिनच्या पुढे जाईल आणि त्याच्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट असेल.

सचिन जगभरात सर्वाधिक सामने खेळला आहे. तर धोनी भारतासाठी 535 तर राहुल द्रविड 503 सामने खेळले आहेत. विराटसाठी राहुल द्रविड आणि धोनीच्या सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकतो मात्र सचिनचा विक्रम मोडणे कठिण जाईल असेही वाटते.

Tags

follow us