विराट कोहलीला ‘पुत्र रत्न’: वामिकाला मिळाला ‘अकाय’

Virat Kohli News : विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे पालक झाले आहेत. अनुष्काने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी मिळाल्यानंतर या दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव […]

Virat Kohli

Virat Kohli

Virat Kohli News : विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे पालक झाले आहेत. अनुष्काने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी मिळाल्यानंतर या दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ही फक्त चर्चाच होती अनुष्का गरोदर असल्याच्या बातमीला विराट आणि अनुष्काकडून दुजोरा देण्यात आलेला नव्हता. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान दोघांचं हे गुपित उघड केलं होतं. त्यानंतर अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चेला उधाण आलं खरं मात्र, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं जात होतं.

Exit mobile version