Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) आणि अटारी सीमा तपासणी नाका बंद करण्यात आला. भारताच्या या कारवाईचा थेट परिणाम पाकिस्तानमध्ये (Pakistan) दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्रही यापासून अलिप्त राहिलेले नाही.
एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार
प्रथम भारतात पाकिस्तान सुपर लीगचे प्रसारण थांबवण्यात आले. आता एका मोठ्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आलंय. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे 29 ते 4 जून दरम्यान होणारी पुरूष राष्ट्रांची व्हॉलीबॉल लीग (Volleyball Men Nations League) आता उझबेकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्य आशिया व्हॉलीबॉल असोसिएशन (CAVA) ने हा निर्णय घेतला आहे. कारण अनेक देशांचे खेळाडू पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्यास तयार नव्हते. यानंतर, CAVA अधिकाऱ्यांनी उझबेकिस्तानमध्ये ही लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाहत्यांसाठी खुशखबर! मारी सेल्वाराजचा नवीन चित्रपट 17 ऑक्टोबर रोजी येणार भेटीला
नेपाळमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय
नेपाळमध्ये 25 एप्रिल रोजी झालेल्या CAVA वार्षिक सर्वसाधारण सभेत, पाकिस्तानमध्ये लीग न आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांचे खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यास नाखूष होते. यानंतर, CAVA ने ठरवले की, पुरुष राष्ट्र लीग त्याच तारखेला उझबेकिस्तानमध्ये आयोजित करावी. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान व्हॉलीबॉल फेडरेशनने सांगितले कारण
पाकिस्तान व्हॉलीबॉल फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी चौधरी मोहम्मद याकूब यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव ठिकाण बदलण्यात आले आहे. काही देशांतील खेळाडू येथे येऊ इच्छित नव्हते. या लीगमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि भारतातील संघ सहभागी होणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सध्याच्या परिस्थितीत भारत सरकार संघाला सहभागी होण्याची परवानगी देणार की नाही, याकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.